पाण्याच्या टाक्‍यांसह इतर मदतीसाठी सहकार्य करा : खा. सुळे

दुष्काळ निवरणासाठी कंपन्यांना साद

पुणे – जिल्ह्याला आतापासून दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्‍यांसह इतर मदत करण्यासाठी औद्योगिक कंपन्यांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील शाळांसह विविध उपक्रमांना आर्थिक मदत करणाऱ्या कंपन्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, महिला व बाल कल्याण सभापती राणी शेळके, कृषी विभागाच्या सभापती सुजाता पवार, समाजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे यावेळी उपस्थित होत्या.

खासदार सुळे म्हणाल्या, “आम्ही विरोधी पक्षात असलो तरी राज्य आणि केंद्र सरकारच्या यादीत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून पुण्याला लौकिक मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. पुणे जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक अंगणवाड्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत वीज मिळणार आहे. कंपन्यांच्या सहकाऱ्यामुळे अंगणवाड्यांचा विकास होत आहे. पाणी, वीजचे सुविधा मिळाल्याने अंगणवाड्यांची रचनाच बदलून गेली असून हा प्रयोग यशस्वी होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारची मदत सर्वच ठिकाणी पोहोचणे अशक्‍य आहे. त्यावेळी औद्योगिक कंपन्यांच्या मदतीचा हात त्या भागात पोहोचला तर त्यांचा विकास निश्‍चित होऊ शकेल.’

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवकाते म्हणाले, सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आतापासून काही भागांतून टॅंकर सुरू झाले आहेत. अजून उन्हाळा सुरू व्हायचा आहे. त्यावेळी किती पाणी टंचाई असेल, हे सांगणे अवघड आहे. त्यासाठी दुष्काळी भागांना मदतीसाठी औद्योगिक कंपन्यांनी कंपन्यांनी मदत करावी.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले, “अंगणवाड्या, आरोग्य तसेच रोजगार मेळाव्यासाठी विशेष उपक्रम कंपन्यांच्या मदतीने राबविणे शक्‍य आहे. त्या करिता कंपन्यांनी त्यांचा “सीएसआर’ निधीचे नियोजन आतापासून करावे. त्याकरिता आम्ही मदतीला तयार आहोत.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)