पाण्याच्या टाक्‍यांना कलात्मकतेचा साज

महापालिकेच्या टाक्‍या ठरताहेत चर्चेचा विषय

पुणे – महापालिकेची समान पाणीपुरवठा योजना वेगवेगळ्या आरोप आणि प्रत्यारोप तसेच वाढीव खर्चामुळे चांगलीच गाजत असली, तरी या योजनच्या पाणी टाक्‍या पुणेकरांच्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.

-Ads-

ज्या टाक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे, त्या आकर्षक रंगसंगतीने सजविण्यात आल्या आहेत. कोंढवा परिसरात उभारण्यात आलेल्या या टाक्‍यांवर समुद्र आणि जंगलांमधील प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात सुमारे 245 कोटी रुपये खर्चून 82 नवीन टाक्‍या उभारल्या जाणार आहेत. त्यातील सुमारे 35 हून अधिक टाक्‍यांचे काम सुरू असून 4 ते 5 टाक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेने काम दिलेल्या कंपनीच्या करारानुसार, या टाक्‍या आकर्षक रंगसंगतीने सजविल्या जाणार आहे. त्यानुसार, काम पूर्ण झालेल्या टाक्‍यांना रंगरंगोटी करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. या पालिकेच्या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)