पाण्याच्या टाकीत बुडून बालकाचा मृत्यू

पिंपरी – खेळताना बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत पडल्याने बुडून एका पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.27) सायंकाळी चिखलीतील घरकुल येथे येथे घडली.

अथर्व नितीन पाटील (वय 5, रा. नेवाळेवस्ती, चिखली) असे मृत्यु झालेल्यापडलेल्या बालकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी अथर्व इमारतीबाहेर खेळत होता. त्याची आई देखील बाहेरच बसली होती. खेळताना अचानक अथर्व बराच वेळ दिसला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील इतर रहिवासीदेखील अथर्वचा शोध घेऊ लागले.

निगडी पोलिसांना ही बाब कळविल्यानंतर आलेल्या पोलीसांनी त्याचा शोध घेताना, राहत्या घरापासुन काही अंतरावर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत चप्पल तरंगतांना आढळून आली. यामुळे पोलिसांनी पाण्याच्या टाकीत उतरून शोध घेतला असता अथर्व बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)