पाण्याचे नियोजनानुसारच वापर करा

अजित पवार : बारामतीत दुष्काळ निवारणासाठी आढावा बैठक

बारामती- बारामती तालुक्‍यामध्ये पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याचा यापुढील काळात नियोजनानुसार वापर करण्याचे आवाहन आमदार अजित पवार यांनी आज (रविवारी) येथे केले.
बारामती तालुक्‍यातील दुष्काळ निवारणासाठी पाणी टंचाई, चारा टंचाई, रोहयो अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाच्या आढावा बैठकीचे कवीवर्य मोरोपंत सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्‍वास ओहोळ, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने उपलब्ध पाण्याचे माणसांच्या व जनावरांच्या पिण्याकरीताच प्राधान्य असणार आहे. बारामती तालुक्‍याला पाणी पुरवठा होत असलेल्या जानाई, शिरसाई तसेच पुरंदर उपसा योजना आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत ओढा खोलीकरण, रूंदीकरण आदी कामे करण्यात येणार आहे. खासदार शरद पवार यांच्या खासदार निधीतून सिमेंट बंधारे बांधण्याकरीता एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तालुक्‍यामध्ये आवश्‍यक तेथे टॅंकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या, रोहयो अंतर्गत करावयाची कामे आदींबाबत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून आवश्‍यक कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.
प्रातांधिकारी हेमंत निकम म्हणाले की, दुष्काळाच्या काळामध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्‍त पिण्याकरीताच करावयाचा असल्याचे सांगून इतर बाबींकरीता वापर होत असल्यास त्या विहिरींवरील विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार आहे. मागील वर्षी नियोजन करण्यात आलेल्या ओढ्यांचे खोलीकरण, रूंदीकरणाची कामे तसेच गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. रोजगार हमी योजनामार्फत करावयाच्या कामांकरीता पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच नागरिकांनी उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या समस्यांचे समाधानकारक उत्तरे देण्यात आली

  • बारामती तालुक्‍यामध्ये आतापर्यंत 10 टॅंकर मार्फत 130 वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत असून नव्याने मागणी करण्यात आलेल्या गावांना जिपीएस प्रणाली लावून तात्काळ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच पाणी वाटपाचे मे महिन्यापर्यंतचे 60 ते 65 टॅंकरचे नियोजन केले आहे. जानाई, शिरसाई योजनेमार्फत तालुक्‍याला पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी तसेच विद्युत विभागाकडे पाठवित आले आहेत. शासनाने जाहिर केलेल्याप्रमाणे तालुक्‍यातील दुष्काळी गावातील 12 हजार विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास पासेस देण्यात आले
    – हेमंत निकम, प्रांताधिकारी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)