पाण्याचे आतापासून नियोजन करणे गरजेचे

नायगाव- पाणी हे जीवन असून पाणी बचतीसाठी आत्ताच योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. सध्या पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. शेती व जनावरांसाठी पाणी मिळत नाही. आपण आताच पाण्याचे योग्य नियोजन नाही केले तर भविष्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष होऊ शकतो, असे मत बेलसर गावच्या सरपंच सुजाता हिंगणे यांनी व्यक्त केले.
पानी फाउंडेशनच्या वतीने सातारा जिल्ह्यातील अनपटवाडी गावामध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर तालुक्‍यातील नायगाव, बेलसर, जवळार्जून, आडाचीवाडी, हरणी, पांडेश्वर, कर्नलवाडी या गावांनी नुकतेच प्रशिक्षण घेतले. त्यांना त्याठिकाणी जलसंधारणाबरोबर मनसंधारण, तसेच तांत्रिक माहिती, स्वतःतील नेतृत्व गुण ओळखणे, संकटांशी सामना करणे आदी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी हिंगणे बोलत होत्या.
पानी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळ मुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल ते 22 मे 2019 आहे. त्यासाठी 100 गुण असणार आहेत. राज्यातील 24 जिल्हे व 76 तालुके यात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील पुरंदर व बारामती तालुका सहभागी आहे. राज्यात प्रथम क्रमांक येणाऱ्या गावाला 75 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 40 लाख रुपये बक्षीस असणार आहे. तर तालुक्‍यात प्रथम येणाऱ्या गावाला 10 लाख रुपयांचे बक्षीस असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)