पाण्याचा नियम वातावरणानुसार अंमलात आणावा – विराट कोहली

राजकोट: भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या “ड्रिंक्‍स ब्रेक’बाबतच्या नव्या नियमावर चिंता व्यक्त केली. त्यानुसार “ड्रिंक्‍स ब्रेक’ केवळ विकेट गेल्यानंतर किंवा षटक संपल्यानंतर घेतला जाऊ शकतो, मात्र सामनाधिकारी बाहेरच्या परिस्थितीचा (उष्णता) विचार करतील, अशी आशा कोहलीने व्यक्त केली.

गेल्या 30 सप्टेंबरपासून ‘वॉटर ब्रेक्‍स’बाबत आयसीसीचा नवा नियम अंमलात आला आहे. त्यानुसार राखीव खेळाडूंना फक्त विकेट्‌स पडल्यावर किंवा षटकांच्या दरम्यानच मैदानातील खेळाडूंसाठी पाणी नेण्याची परवानगी असेल. राजकोटमध्ये पार पडलेल्या भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीदरम्यान तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला होता. त्यामुळे उभय संघांतील खेळाडूंना सतत तहान लागत होती. यामुळे खेळाडू पाण्याच्या ब्रेक्‍सचीही मागणी करत होते; पण पंचांनी यावरुन खेळाडूंना टोकले आणि नियमाची आठवण करून दिली.

-Ads-

यावर कोहलीची प्रतिक्रिया असते, ‘ज्या ठिकाणी सामना आहे, त्या ठिकाणचे वातावरण कसे आहे, यावरून या नियमांची अंमलबजावणी व्हावी असे वाटते. तशी लवचीकता दाखवायला हवी. उष्णता खूप असलेल्या ठिकाणी सामने असतील 40 ते 45 मिनिटे पाण्याशिवाय राहणे खरोखरच कठीण असते. मला खात्री आहे की आयसीसी याबाबत नक्कीच पुनर्विचार करेल’. पंच असे पाणी पिण्यास टोकत असल्यानेच चेतेश्वर पुजाराने फलंदाजी करताना आपल्या खिशातच पाण्याची लहान बाटली ठेवली होती. या नव्या नियमामुळे ज्यादा फलंदाज घेता आला नसल्याचे कोहलीने सांगितले. ‘पाचवा गोलंदाज संघात असणे मस्ट होते. आम्हाला खरेतर ज्यादा फलंदाज खेळवायचा होता; पण अशा उष्ण वातावरणात चार गोलंदाजांवरच माऱ्याचा भार टाकणे शक्‍य नव्हते. पाचवा तज्ज्ञ गोलंदाज अंतिम संघात आवश्‍यकच होता’, असे कोहली म्हणाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)