पाण्याचा आढावा घेऊन निर्णय घेणार – पालकमंत्री

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता, नागरिकांना पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीकपात केली जाणार नाही, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली. तर, भविष्याचा विचार करून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आव्हानदेखील त्यांनी केले.

जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार पुणे शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मागील महिन्यात झाला. त्यामुळे पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार हे निश्‍चित मानले जात होते. मात्र, त्या पूर्वीच नागरिकांना मागील काही महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यात आणखी भर पडणार म्हणून महापालिकेतील विरोधी पक्षांनी महिनाभरात अनेक आंदोलने केली. त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘धरणात पाणी मुबलक असून जलसंपदा विभाग चुकीची माहिती देत आहे. शेतीला आणि शहराला सुरू असलेले पाणी देऊनही कपात करावी लागणार नाही,’ असे सांगत कपात न करण्याची मागणी तुपे, शिंदे, बराटे यांनी केली. त्यानंतर धरणातील पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेत ही बैठक संपविण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)