पाण्याअभावी पिके कोमेजली

कवठे – वाई तालुका हा अति पर्जन्यमान असलेला तालुका म्हणून ओळळला जातो. मात्र, याच तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण हे नेहमीच अत्यल्प राहिले आहे. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर पडलेल्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरण्या केल्या.

पिकेही चांगली जोमात उगवून आली आहेत. परंतु, सध्या या पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, पाणी स्त्रोत आटल्यामुळे पिकांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या स्वत:च्या विहिरी तसेच बोअरवेल आहेत. मात्र, त्यांनाही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे या भागातील पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागली आहेत. पाणी मिळत नसल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जाण्याची शक्‍यता निर्माण झाली असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)