पाण्याअभावी ज्वारीच्या उत्पादनात घट

वाई तालुक्‍यातील परिस्थिती, शेतकरी चिंताग्रस्त

वाई, दि. 21 (प्रतिनिधी) – यंदाच्या तुलनेत धरणक्षेत्र वगळता इतर भागात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस पडला आहे. वाई तालुक्‍यातही तिच परिस्थिती असल्याने जानेवारीपासून जलस्त्रोतातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीमध्ये पाणी साठलेच नाही. निर्सगाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसलाच. परंतु रब्बी हंगामसुध्दा पूर्णपणे धोक्‍यात आला आहे. पिकांना पाणीच देता न आल्याने ज्वारीची उंची खुंटली असून कणसात दाणाच भरला नाही. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात कमालीची घट होणारे चित्र सध्या वाई तालुक्‍यात पाहवयास मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील सर्वच भागातून ही परिस्थिती पहावयास मिळत आहे. पिकांना पाणी उपलब्ध न झाल्याने ज्वारीच्या पिकाची अवेळी काढणी करावी लागण्याची शक्‍यता आहे. एकरी दोन ते तीन क्विटंल ज्वारीचे उत्पादन निघण्याची खात्री बळीराजाला नाही. जनावरांच्या वैरणीचा प्रश्न काही अंशी सुटला असला तरी माणसांच्या पोटाचे काय? हा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या भेडसावत आहे. ज्या कुंटुंबाचा उदनिर्वाह याच पिकांवर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडणार आहे. पिक घेण्यासाठी करण्यात आलेला खर्चसुध्दा हाती न आल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला जाणार आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या संबंधीत विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाई तालुका उस, हळद, आले, स्ट्रॉबेरी या पिकांबरोबर चांगल्या पध्दतीची ज्वारी पिकविण्यात अग्रेसर आहे. ज्वारीच्या विविध प्रकारच्या जाती घेतल्या जातात दगडी, मालदांडी व इतर संकरीत वाणांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. व्याजवाडी, ओझर्डे, खानापूर, कवठे ते वेळे महामार्गाच्या संपूर्ण पट्ट्यात ज्वारीच्या पिकांचे चांगले उत्पन्न घेतले जाते. या गावांमधील कालव्यांच्या जवळ असलेल्या जमिनीत नगदी पिके घेतली जातात तर इतर ठिकाणी ज्वारीचे पिक विहीरीच्या पाण्यावर अवलंबून असते.

एकदरीत संपुर्ण तालुक्‍यामध्ये खरीप हंगाम पावसाच्या लहरी पणामुळे वाया गेला त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिके ज्वारीए हरबरा, गहु ही पिके ही धोक्‍यात आली आहेत. याही पिकांना वातावरणाचा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. संबंधीत कृषि विभागाने तालुक्‍यातील दृष्काळजन्य भागातील सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)