पाण्यासाठी कोरड्या नीरा नदीत उपोषण

निमसाखर- नीरा नदी किनाऱ्यावरील शेतीपिके जगवण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नदीत पाणी सोडावे या मागणीसाठी नदीकाठच्या गावतील 35 पेक्षा अधिक शेतकरी कोरड्या नदी पात्रात बेमुदत उपोषणला बसले आहेत.
प्रशासनाने नदीमध्ये पाणी सोडावे यासाठी नदीकाठचे शेतकरी पाठपुरावा करत आहेत. मात्र प्रशासन पाणी सोडण्यास विलंब करीत असल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. 20) रास्तारोको आंदोलन केले होते. तरी शासनाला जाग न आल्याने शेतकऱ्यांनी आज (गुरुवार) पासून निरवांगी (ता. इंदापूर) येथील कोरड्या नदीमध्ये बेमुदत उपोषण सुरू केले आहे. माजी सरपंच दशरथ पोळ,खोरोची सरपंच संजय चव्हाण, धनंजय रणवरे,सुनिल रणवरे, शंकर होळ, दत्तात्रेय पोळ, सतिश हेगडकर, अमोल रणवरे, दादासाहेब सुळ, समीर पोळ आदी शेतकरी उपोषणास बसले आहेत. दरम्यान, उपोषणस्थळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पाटबंधारे विभागाचे आर. के. गुटूकडे, लक्ष्मण सुद्रीक यांनी भेट देवून शेतकऱ्यांच्या अडणीअडचणी समजावून घेतल्या व शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांनपर्यंत पोहोचवल्या असून यावर लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदी जानेवारी महिन्यापासून कोरडी पडली असून कळंबपासून नीरा नरसिंगपूर पर्यंतच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही. नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडू लागल्या असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असल्याने पाण्याअभावी नदीकाठच्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू करून टोकाचे पाऊल उचलले आहे.

  • दोन दिवसांत मार्ग काढणार
    नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी एका शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रेय भरणे यांची भेट घेऊन नीरा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली. याप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत रणवरे ,वीरसिंह रणसिंग, विठ्ठल पवार, रवींद्र पोळ, दादासाहेब वाघमोडे आदी उपस्थित होते. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील जिल्हाअधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क करून पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. यावेळी दोन दिवसांमध्ये पाणी सोडण्यावरती मार्ग काढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)