पाणी साठा संपला पडल्याने मासे मृत्युमुखी

आंधळी तलावत केवळ मृत पाणीसाठा शिल्लक : दुषीत पाण्याने भागवली जातेय तहान

दहिवडी, दि. 3 (वार्ताहर) – माण तालुक्‍यात असणाऱ्या आंधळी तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला असून सध्या धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्यातील मासे मृत्यूमुखी पडले असून पाणी दुषित झाले असून आहे. हेच पाणी दहिवडी बिदाल, गोंदवले गावात वापरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ऐन दिवाळीत साथीचे आजार पसरले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
दहिवडीच्या उत्तर बाजूला आंधळी तलाव असून या तलावातील पाण्याचा पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापर केला जातो. सध्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून या ठिकाणाहून महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठ्याचा माध्यमातून दहिवडी, गोंदवले, बिदाल या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तलावाच्या पात्रात पाणी नसल्याने पात्र कोरड पडले आहे. या तलावाच्या मध्यभागी मोठ-मोठ्या विहिरी असून त्या विहिरीतून हा पाणी पुरवठा होतो. याच विहिरीत असलेली पाण्याची पातळी खालावली आहे. मासे तडफडू लागले असून पाण्यावर तवंग आला असून त्यास दुर्गंधी येत आहे.
इतर विहिरीतून शेकडो मोटारींच्या माध्यमातून टंचाई काळातही अनेकजणांनी विद्युत जोडणीद्वारे मोटारीद्वारे विनापरवाना पाणी उपसा केला आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली जात आहे.
पाटबंधारे विभागाने धाड टाकत चार शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, ती पुरेशी नसून व्यापक प्रमाणात कारवाई तसेच टंचाईबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)