पाणी समस्येवर कायमचा तोडगा निघावा : प्रा.परांजपे

पुणे – आपल्याला गरजेपेक्षा जास्त मिळणाऱ्या पाण्याचा आपण अपव्यय करतो. पण, हे कोणी लक्षात घेत नाही. आपल्यामुळे प्रदूषित झाल्याने पाण्याने इतर लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. पाण्याच्या साठवणुकीच्या बाबतीत आपण राजस्थान आणि गुजरातचा आदर्श घेण्याची गरज आहे. पाणी उपलब्धतेच्या समस्येला प्राप्त झालेले राजकीय महत्त्व ही गंभीर समस्या आहे. राजकारणाशिवाय हा मुद्दा सोडवला जात नाही, अशी टीका जलतज्ज्ञ प्रा. विजय परांजपे यांनी केली.

13 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. पुरंदरे बोलत होते. यावेळी वसुंधरा पर्यावरण पत्रकार पुरस्कारच्या सन्मानार्थी राखी चव्हाण आणि छायाचित्रकार सचिन राय, डॉ. संजीव नलावडे, डॉ.सचिन पुणेकर, सुप्रिया चित्राव आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“निसर्ग आणि पर्यावरणाविषयी लोकांच्या मनात आवड आणि आत्मीयता निर्माण झाली आहे पण जागरूकता दिसत नाही. पर्यावरणाविषयी संवेदना आणि कळवळा असणाऱ्यांची संख्या खूप असली तरी प्रत्यक्ष काम करणारे मात्र कमी आहेत,’ असे मत राखी चव्हाण यांनी व्यक्त केले.

“भारतामध्ये दुर्दैवाने अजूनही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे क्षेत्र व्यवसायाचे क्षेत्र झाले नाही. आपल्या अर्थार्जनासाठी वेगळा पर्याय निर्माण करूनच आपण या क्षेत्रात काम करू शकतो. केवळ छंद आणि हौस म्हणून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता येत असल्यामुळे अनेक चांगल्या छायाचित्रकारांना देखील अर्थार्जनासाठी वेडिंग फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी करावी लागते,’ असे मत सचिन राय यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)