पाणी सभापतींना महिलांचा घेराव

रस्त्यावर कळशा मांडून राधिका चौकामध्ये टाहो

सातारा – पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी सातारा नगरपरिषदेचे पाणी सभापती श्रीकांत आंबेकर यांना नामदेव झोपडपट्टीतील संतप्त महिलांनी घेराव घातला. रस्त्यावर कळशा मांडून तसेच त्या आपटून तब्बल अर्धा तास येथील महिलांनी राधिका चौकामध्ये टाहो फोडला. सकाळी 9.30 वाजल्यापासून त्या ठाण मांडून आपल्या मागणीचा निषेध नोंदवत बसून होत्या त्यामुळे राधिका चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपरिषदेच्या पाणी सभापती श्रीकांत आंबेकर व आधिकाऱ्यांना संबधीत घटना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली. पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ पुरवठा निरीक्षक दिग्वीजय गाडवे, आणि दिपक राऊत, तसेच सभापती यांनी संतप्त झालेल्या महिलांना शांत करत तुमच्या समस्यांची सोडवणूक करतो असे सांगितले. तरीदेखील महिलांची ऐकण्याची मनस्थिती नव्हती यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. शाहुपूरी पोलीसांनी देखील या महिलांपुढे जाण्याची हिम्मत दाखवली नाही मात्र वाहतुक व्यवस्था नियंत्रित केली.

आम्हाला कित्येक दिवस पिण्यासाठी पाणीच नाही आम्ही करायचे काय? दैंनदिन पिण्याच्या पाण्यासाठी इतर लोकांच्या दारात जावे लागते. त्यांच्याकडूनही पाणी मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. सातारा नगरपरिषदेच्यावतीने देण्यात आलेली बोअर वेल बिघडली आहे. त्यामुळे आम्हाला पाणीच मिळत नाही या मागणीचा महिलांचा गोंधळ सुरू होता. शेवटी पाणी सभापती श्रीकांत आंबेकर व आधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नामदेव झोपडपट्टी येथे महिलांसोबत जाऊन उद्याच तुम्हाला पाणी मिळेल, तसेच दोन दिवसात बोअरवेल पण दुरुस्त करून देतो असे आश्‍वासन दिल्यानंतर महिलां शांत झाल्या.

सातारा अर्कशाळा गेंडामाळ नाका येथे सुरू असलेल्या कामामुळे पाणी व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील सर्वच नागरिकांना पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यासाठी सातारा नगरपरिषदेच्या पाणी पूरवठा विभागाचे कर्मचारी आधिकारी, नगरसेवक यांनी जातीने लक्ष देऊन संबधित विषय तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामध्ये या महिलांना झालेल्या गैरसोईची तातडीने दखल घेउन उपाययोजना करणार आसल्याची माहिती पाणी सभापती श्रीकांत आंबेकर, व कनिष्ठ पाणी पूरवठा निरीक्षक यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)