पाणी शुद्धीकरणासाठी 72 लाखांचा खर्च

पिंपरी – महापालिकेच्या सेक्‍टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील पॉली ऍल्युमिनिअम क्‍लोराईड दोन ठेकेदारांमार्फत पुरवून पाणी शुद्ध केले जाते. पावसाळ्यात पाण्याची गढुळता जास्त वाढण्याची शक्‍यता असल्याने आणखी 471 टन द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील केमिकल्स घेण्यात येणार आहे. त्यासाठी 72 लाख रूपये खर्च होणार आहे. स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या सेक्‍टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण प्रक्रीया केली जाते. त्यासाठी द्रवरूप स्वरूपातील पॉली ऍल्युमिनिअम क्‍लोराईड व पावडर स्वरूपातील पॉली अल्युमिनिअम क्‍लोराईड पुरविण्यात येते. एस.व्ही.एस. केमिकल्स कॉर्पोरेशन आणि आयडीयल केमिकल्स या दोन ठेकेदारांना अनुक्रमे 60 आणि 40 टक्के या प्रमाणे हे केमिकल्स पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आवश्‍यक्ता भासल्यास निविदा दराने 50 टक्के जादा परिमाण पुरविण्याची अट निविदेत घालण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसाळ्यातील पाण्याची गढुळता कमी करण्यासाठी या कामाची निविदा पावसाळ्यापूर्वी काढण्यात येते. यावर्षी जुलै 2017 पासून जीएसटी करप्रणाली सुरू झाली. त्यामुळे पॉली ऍल्युमिनिअम क्‍लोराईडचा (पीएसी) दर निश्‍चित होण्यासाठी बराच कालावधी लागला. नवीन कामातील पीएसीचा दर मे महिन्यात प्राप्त झाल्याने निविदा काढण्यास विलंब झाला. त्या अनुषंगाने या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. पावसाळ्यात पाण्याची गढूळता वाढण्याची शकयता असते. यंदा पाऊस लवकर सुरु झाला असल्याने पाण्यातील गढुळता जास्त वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पॉली अल्युमिनिअम क्‍लोराईडचा वापर जास्त होणार आहे.

सध्या जलशुद्धीकरण केंद्रात द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील या केमिकल्सचा अनुक्रमे 150 आणि 45 टन इतका साठा शिल्लक आहे. त्यामुळे निविदेतील अटीनुसार, 50 टक्के वाढीव द्रवरूप केमिकल्सचा पुरवठा घेणे शक्‍य आहे. मात्र, चालू निविदेतील करारनाम्यानुसार सध्या 25 टक्के द्रवरूप केमिकल्स घेण्यात आले आहे. निविदेतील परिमाणापैकी वाढीव 25 टक्के द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील पीएसी घेणे आवश्‍यक आहे. हा पुरवठा चालू निविदा दराने म्हणजेच 11 हजार 900 रूपये प्रति टन आणि 31 हजार 350 रूपये प्रति टन अनुक्रमे द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील पीएसी देणे ठेकेदारास बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)