पाणी योजनेचा वीजपुरवठा होणार खंडित

नगर: शहर पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठ्याच्या थकीत बिलासाठी महावितरणने महापालिकेला नोटीस बजावली आहे. चोवीस तासात महापालिकेने पैसे जमा केले नाही तर केव्हाही पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याने महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. आज दुपारपर्यंत महापालिकेकडून महावितरणला पैसे भरले नव्हते.

शहर पाणी पुरवठा योजनेची थकबाकी 179 कोटींवर पोहचली आहे. शासनाच्या निर्देशानुसार महावितरणने महापालिकेला जुन्या थकबाकीचे हप्ते करुन दिले आहेत. तर थकबाकीची 50 टक्के रक्कम शासनाकडूनच महावितरणला अदा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थायी समितीचे तत्कालीन सभापती व विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनीच सभेमध्ये थकबाकीचे 30 समान हप्ते करुन थकबाकी भरण्यास मंजुरी दिली होती. मात्र, गेल्या 5 महिन्यात थकबाकीपोटी भरावा लागणारे दरमहा 1 कोटीचा हप्ताही मनपाने भरलेला नाही. तसेच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची तीन कोटींची बिलेही मनपाने थकविली आहे.
महावितरणने नोटीस बजावल्यानंतर महापालिकेने 25 लाखांची रक्कम चालू बिलांपोटी अदा केली आहे. मात्र, ती रक्कम पुरेशी नसल्याने व नोटिसीची मुदत संपलेली असल्याने महावितरणकडून कोणत्याही क्षणी कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, महापालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी रजेवर आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)