पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

कुरवली/भवानीनगर- पाटबंधारे विभागाच्या गैरकारभारामुळे नीरा डाव्याकालव्यातून गेल्यावर्षीप्रमणे यंदाही वेळेवर शेतीसाठी पाणी मिळाले नाही, त्यामुळे डोळ्यादेख पिके जळत असून डोक्‍यावर कर्जाचा डोंगर असल्याने इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक तथा बेलवाडी येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्यांच्या खिशात दोन चिठ्ठ्या आढळून आल्या असून आत्महत्येस पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह पाटबंधारे विभाग जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे या चिठ्ठ्यांमध्ये नमूद केले असल्याने एखच खळबळ उडाली आहे.
वसंत सोपान पवार (वय 48, रा.बेलवाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी तथा इंदापूर अर्बन बॅंकेच्या संचालकाचे नाव आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीच्या औषधे व खतांचे दुकान असून त्यांची लासुर्णे व बेलवाडी परिसरात शेती आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 21) ते दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला मात्र, ते आढळून आले नाहीत. आज (रविवार) सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदार वस्तीजवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा दिसून आला. पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्या आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाली आहेत. कर्जबाजारी झाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे साहय्यक निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक फौजदार शिवाजी होले, महेंद्र फणसे करीत आहेत.

  • कुंटूबाला न्याय मिळवून द्या….
    माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सदस्य ऍड. हेमंत नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी सरकारच्या विरोधातामध्ये आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करावा असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.
  • पाटबंधारे विभागाकडून केवळ आश्‍वासनांचे “गाजर’
    जलसंपदा विभागाच्या गैरकारभारामुळे गतवर्षी लासुर्णे, बेलवाडी परिसरातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्यातून उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळाले नव्हते. यामुळे या परिसरातील सात हजार एकरातील पिके जळून खाक झाली होती. यावर्षीही कालव्यातून पाणी मिळण्यास विलंब होत आहे. वसंत पवार यांच्यासह या परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. 13) रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 42 व 43 क्रंमाकाच्या वितरिकेला मंगळवारी (दि. 17) व गुरुवारी (दि. 19) पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी पाणी सोडले नाही, त्यातच सूर्य आग ओकत असल्याने पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहे.
  • या घटनेची मयत खबर आमच्याकडे दाखल असून उपलब्ध पुराव्यानुसार पुढील तपास करून कार्यवाही करण्यात येईल.
    – उत्तम भजनावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वालचंदनगर पोलीस ठाणे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)