पाणी बचत हीच पाणीनिर्मिती ठरणार

संगमनेर – “”या वर्षात तालुक्‍यात जलसाक्षरता अभियान राबवण्यात येणार आहे. पाणी बचत हीच पाणी निर्मिती ठरणार आहे,” असे प्रतिपादन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले. जागतिक जलदिनानिमित्त सह्याद्री विद्यालयात आयोजित “पाणी वाचवा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बाबुराव गवांदे, प्राचार्य बी. के. शिंदे, नम्रता पवार, अशोक गुंजाळ, नामदेव कहांडळ, सचिन गुंजाळ, रवी सोनवणे, पुष्पा कासार, मंगला देशमुख यावेळी उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या, “”निसर्गनिर्मित पाणी, हवा यांचे मानवाला महत्त्व नाही. परंतु, त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पाणी टंचाईमुळे दुष्काळी भागात अगदी हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. त्यांना त्याचे मोठे महत्त्व आहे. वाढती लोकसंख्या, पाण्याचा अपव्यय, नियोजनाचा अभाव, पाण्याचा अतिवापर याबाबत सर्व स्तरावर जाणीव जागृती होणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबर पाणी संवर्धन होण्यासाठी यावर्षीपासून जल साक्षरता अभियान राबवण्यात येणार आहे. यामधून गावोगावी महिलांमध्ये पाणी बचतीच्या महत्त्वाबाबत जागृती केली जाणार आहे. पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, गाणी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीसाठी स्पर्धा, पावसाचे पाणी अडवणे, पाणी बॅंक, जलदिंडी या विविध उपक्रमांचे यात आयोजन करण्यात येणार आहे. वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला तर नक्कीच पाणी बचतीसाठी मोठे कार्य होईल.” जलदिनानिमित्त नगराध्यक्षा तांबे यांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)