पाणी फाऊंडेशनच्या सातत्याचा ग्रामस्थांना फायदा

पेडगाव येथील पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या वृक्ष दिंडीच्या शुभारंभ प्रसंगी गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकर व इतर.

वडूज, दि. 10 (प्रतिनिधी) – पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक गावांत चांगल्या विधायक विचाराचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. यामध्ये चांगली ऊर्जा असणाऱ्या युवकांचा मोठा भरणा आहे. त्यामुळे वॉटरकप स्पर्धेव्यतिरिक्त इतर विकासकामात पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी झोकून दिल्यास त्याचा मोठा फायदा ग्रामस्थांना मिळेल, असे मत पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे यांनी व्यक्त केले आहे.
पेडगाव, ता. खटाव येथे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या वृक्षदिंडी, वृक्षारोपण या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकर, संजय गांधी निराधार योजनेचे विजय शिंदे, धंनजय क्षीरसागर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मोहनराव जगदाळे, आनंदशेठ जगदाळे, माणिकराव जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, विजय जगदाळे, सुधीर जगदाळे, सचिन निकम, विनोद मोहिते, भ्रमदेव जगदाळे, राहुल लावंड आदी उपस्थित होते.
यावेळी मांडवे यांनी पेडगावमध्ये सुशिक्षित युवकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी निवृत्त पोलीस अधिकारी विलासराव जगदाळे,अशोकराव जगदाळे, माजी सरपंच अंकुशराव दबडे, विजय जगदाळे, अधीक जगदाळे, सचिन निकम, विजय माने, सुधीर जगदाळे, सागर जगदाळे आदीसह पाणी फाऊंडेशन टीम व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच दादासाहेब मोकाशी कृषी विद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी सहकार्य केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)