“पाणी फाउंडेश’मुळे इंदापूरचा दुष्काळ मिटेल

जंक्‍शन- भयानक दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच गावा गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इंदापूर तालूक्‍यातील निरगुडे गावामध्ये पाणी फाउंडेशनचे सत्यमेव जयते या स्पर्धेतंर्गत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या व जलयुक्तचे कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच या उपक्रमामुळे इंदापूर तालुक्‍यातील कृत्रीम दुष्काळ हटेल व तालूका राज्यात एक नबंरचा प्रगतशील बागायतदार तालुका म्हणून ओळखला जाईल असा विश्‍वास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्‍त केला.
निरगुडेमध्ये सुरू असलेल्या या जलयुक्‍तच्या कामास हातभार लागावा व ग्रामस्थांचा उत्साह वाढावा म्हणून हर्षवर्धन पाटील व जिल्हा परिषदेचे सदस्य सागर भोसले यांनी न थकता महाश्रमदान केले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इंदापूर तालूका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष हनुमंत काजळे पाटील यांच्यासह सरपंच-उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गावातील युवक-युवती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, निरगुडे गावामध्ये सकाळी लवकर लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत तसेच राजकारण व गटतट बाजूला ठेऊन सारे गाव दुष्काळमुक्‍तीसाठी एकटवला असल्याने हे गाव नक्की पाणीदार बनेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)