पाणी प्रश्‍नासाठी एक होऊन काम करणे गरजेचे

पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते म्हणाले, सर्व गावांचा विकास टीपी स्कीमच्या माध्यमातून करत असताना सर्वांत आधी पाण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून केले जाणार आहे, त्यानंतरच रिंगरोड व टीपी स्कीम राबविल्या जाणार आहेत. पाझर तालावाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा ग्रामस्थांना पुरविल्या जातील. जवळपासच्या गावांचा विचारकरून पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे नियोजन केले जाणार आहे. पाझर तलावाची जवळपास 30 हजार क्‍युबिक मीटर गाळ काढून खोली वाढविली जाणार आहे. त्यामुळे पाझर तलावाची क्षमता दुप्पट होईल. प्रामुख्याने पिण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न मिटेल.

पालकमंत्री बापट : वडारवाडी पाझर तलावाचे काम सुरू

पुणे-पाझर तलावाच्या माध्यमातून पाणी साठवण क्षमता वाढवून भविष्यात पुरेल, अशा पाणीसाठवणुकीचे नियोजन करायचे आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून पाझर तलावासाठी 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 15 ते 20 तलावांचे खोलीकरण केले जाणार आहे. तलावातील गाळ काढून साठवण क्षमतेत वाढ झाल्यास भीषण उन्हाळा जाणवणार नाही. ग्रामस्थांनी देखील पाणी प्रश्‍नासाठी एक होऊन काम करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

पीएमआरडीए, जिल्हा नियोजन समिती आणि पाटबंधारे विभाग यांच्या विद्यमाने तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी वडाचीवाडी येथील पाझर तलाव नूतनीकरणा बापट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ सुरज मांढरे, विद्युत वरखेडकर, कार्यकारी अभियंता एस. बी. देवढे, वडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय बांदल, उपसरपंच जिजाबा बांदल, माजी सरपंच बबन बांदल आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले, पाण्याचा साठा करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने मी जिल्ह्यात जनआंदोलन करणार आहे. वडाचीवाडीचा पाझर तलाव हा महाराष्ट्रातील आदर्शवत पाझर तलाव करणे आमचे उदिष्ट आहे. उपयुक्त व दगडमिश्रित गाळ बाजूला करणे आवश्‍यक आहे. गावकऱ्यांच्या इच्छेविरोधात येथे होणारी टाउन प्लानिंग स्कीम करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे ही स्कीम करताना शेतकऱ्यांचा व जमीन मालकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही बापट यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी सुरज मांढरे यांनी तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच गाळ काढून झाल्यानंतर पावसाळ्यात या भागात वृक्ष लागवड करण्यासाठी ही जिल्हा परिषद पुढाकार घेईल,असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)