पाणी पुरवठ्याचे वॉल्व्ह उघड्यावर अपघातांना निमंत्रण

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी)- सातारा शहरात अनेक ठिकाणी पाणी सोडण्याचे वॉल्व्ह उघड्यावरच असल्याचे दिसते आहे. सातारा जेल समोरील मल्हार पेठ येथील असाच एक वॉल्व्ह अपघाताला निमंत्रण देण्यासाठी उघडा ठेवला आहे काय असा प्रश्न आहे. सातारा नगरपरिषदेच्यावतीने शहरात विविध भागांतील पाणी सोडण्यासाठीच्या वॉल्व्हवर कोणत्याही पद्धतीचे झाकण अथवा जाळी बहुतांश भागात बसवली नसल्याने अपघाताची शक्‍यता आहे. याचबरोबर या वॉल्व्ह मधून पावसाचे, नाल्याचे सांडपाणी मिसळून पाणी प्रदूषण देखील उद्भवू शकते . सातारा शहरात असे अनेक वॉल विविध भागांतील रस्त्यांवर पाह्यला मिळतात. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी नाल्याच्या बाजूला वॉल्व्ह आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी वॉल्व्हबत सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्‍यक आहे.

सातारा नगरपरिषदेच्या वतीने अश्‍या धोकादायक तसेच उघड्या स्वरूपात असलेल्या वॉलला कायम स्वरूपी बंदिस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र या साठी कधी सुरुवात केली जाणार असा प्रश्न आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पाणी गळती असे वास्तव सध्या साताऱ्यात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व काही भाग नगरपरिषदेच्या अखत्यारीत येतो. मात्र या दोन्ही कार्यालयामध्ये समन्वयाचा अभाव व काम कोणी करायचे असा प्रश्न असल्याने पाणी गळती राजरोस सुरूच असल्याचे दिसत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)