पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा कारवाई

पिंपरी – पवना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहेत. आठ दिवसांत शहराच्या सर्व भागाला सुरळीत पाणी पुरवठा करावा. अन्यथा संबंधित भागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

पाणी टंचाई, गळती, नदी प्रदूषण, पर्यावरण संवर्धन, ड्रेनेज चोकअप यासंबंधित समस्या निर्माण झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी पाणी पुरवठा विभाग, पर्यावरण विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर आदी उपस्थित होते.

पावसाळा सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या समस्या आहेत. काही भागांमध्ये पुरेसा पुरवठा केला जात नाही. याला नेमके कोण जबाबदार आहे. याचा तपास लागला पाहिजे. ज्या ठिकाणी पाणी गळती होऊन ड्रेनेजचे दूषित पाणी एकत्रीत होत असेल, अशा ठिकाणांसह शहरातील गळतीचे प्रमाण रोखले पाहिजे. यावर आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी तासभर चर्चा केली. तसेच, पवना व इंद्रायणी नदीपात्रात नाल्यांचे दूषित पाणी सोडले जाते. त्यामुळे नदी पात्राची स्वच्छता केली तरीही घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. नदी पात्रात सोडल्या जाणाऱ्या सर्व नाल्यांचे सर्व्हेक्षण करून सविस्तर अहवाल तयार करावा. त्यानंतर ड्रेनेज लाईनला न जोडता नाल्यात सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश पाणी पुरवठा, पर्यावरण आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)