पाणी पुरवठा लाभ करात होणार वाढ

पिंपरी – महापालिकेच्या स्थायी समितीने मागील सभेत पाणीपट्टी दरात दुप्पटीने वाढ केली आहे. त्याचबरोबर आता मिळकतकरातील पाणीपुरवठा लाभ निवासी करात 4 वरुन 8 टक्के आणि निवासीत्तेर करात 5 वरुन 10 टक्के करण्यात येणार आहे. तसेच पाणीपट्टी नसलेल्या मिळकतधारकांना 5 टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्या वाढीस मान्यता देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि. 31) होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात अमृत योजनेअंतर्गत 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. तसेच भामा-आसखेड व आंद्रा धरणातून 300 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यासाठी अंदाजे 236 कोटी खर्च अपेक्षित आहे. महापालिकेला राज्य शासनाकडे 70 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. तसेच धरण ते चिखलीपर्यंतच्या पाणीपुरवठा वाहिनी कामासाठी 500 कोटी खर्च अपेक्षित आहे. असे एकूण 806 कोटी रुपये खर्च महापालिकेस करावे लागणार आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी मिळकतकरातील पाणीपुरवठा लाभकरामध्ये दुप्पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. निवासी मिळकतधारकांना एकूण मिळकतकरासह 4 वरून 8 टक्के कर निश्‍चित केला आहे, तर इतर मिळकतींना 5 वरून 10 टक्के कर आकारण्यात येणार आहे.

-Ads-

दरम्यान, शहरात पूर्वी असलेले अ, ब, क आणि ड या चार विभागांची पुनर्रचना करून तीन विभाग करण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रत्येक मिळकतीचे करयोग्य मूल्य (एआरव्ही) महानगरपालिका ठरविणार आहे. त्यानुसार त्या मिळकतींना मिळकतकर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या एकूण मिळकत कर उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थायी समिती सभेच्या मान्यतेनंतर या करवाढीची अंमलबजावणी 1 एप्रिल 2018 नंतर शहरात लागू करण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)