पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडले

– राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

पिंपरी – शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण भरले असतानाही शहरात व्यवस्थीत पाणी पुरवठा केला जात नाही. या विरोधात राष्ट्रवादीने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाच कार्यालयामध्ये कोंडून बाहेरुन कुलुप लावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी त्यांनी शहरातील अनेक भागात विस्कळीत त्याच्बरोबर दूषित पाणी पुरवठा होतो, त्या बाबत वारंवार केलेल्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी पाणी पुरवठा करणारे अधिकारी राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्या प्रभागात निवडून आले त्या प्रभागात पाणी पुरवठा खंडीत करतात असा गंभीर आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.

महापालिका आयुक्त आल्या शिवाय टाळ उघडणार नसल्याचा पावित्रा आंदोलकांनी घतला होता. शेवटी महापालिका आयुक्त दाखल झाले. आयुक्त आंदोलनकर्ते व पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी यांच्या सध्या बैठक सुरु आहे. दरम्यान टाळे बंद आंदोलनामुळे कोंडले गेलेले अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच धास्तावले होते. यावेळी शहरात विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्या प्रभागात आहेत, तिथेच पाण्याचा प्रश्न कसा काय उदभवतोय असा सवाल यावेळी करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)