पाणी पिण्याच्या बहाण्याने चोरी

पिंपरी – पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चार जणांनी मिळून जबरदस्तीने 27 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरीतील लांडेवाडी येथील मदने चाळ येथे घडली.

सौरभ सुरेश ओझा (वय-20, रा. मदने चाळ, पार्वती हाईट जवळ, लांडेवाडी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 20 ते 22 वर्ष वयाच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ त्यांच्या मित्रांसोबत मदने यांच्या चाळीमध्ये भाड्याच्या खोलीत राहतात. 20 ते 22 वर्ष वयाचे चार तरुण फिर्यादी यांच्या खोलीच्या बाहेर आले. त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करून खोलीत प्रवेश केला. चौघांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. चौघांनी मिळून सौरभ आणि त्यांच्या मित्रांचे पैसे, मोबाईल फोन आणि घड्याळ असा एकूण 27 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोर तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)