पाणी नियोजनाला आधार जल पुनर्भरणाचा 

भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून भूजल भवनाने उपलब्ध केली शास्त्रीय माहिती

पुणे – नेहमीच्या जगण्यात पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. मात्र नैसर्गिक स्रोतांबरोबरच राज्यातील भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अशास्त्रीय पद्धतीने राबविलेल्या विकास योजना.

आतापर्यंत नगरनियोजनात फक्‍त पाणलोट क्षेत्राचा विचार केला जात असे. त्यानुसार विविध योजना राबविल्या जात. यावेळी जल पुनर्भरणाचा अथवा पाण्याच्या भूमिगत प्रवाहाचा फारसा विचार केला जात नसे. या माहितीमुळे परिसरातील पाण्याच्या उपलब्धतेची आणि त्याच्या प्रवाहाची अचूक माहिती मिळते. त्यामुळे जलयुक्त शिवार, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या उपाययोजना कोणत्या क्षेत्रात कशा प्रकारे राबविता येतील, याबाबत अधिक स्पष्टता येईल.
– शेखर गायकवाड, संचालक, भूजल भवन.

मात्र योग्य अभ्यास करून विकास योजना राबविल्यास राज्यात भूजल पातळी वाढून मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. यासाठी जागतिक जल दिनानिमित्त भूजल भवनातर्फे “जल पुनर्भरण’ संदर्भात शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भूजल भवनाने राज्यभरातील भौगोलिक परिस्थितीचा शास्त्रीय अभ्यास करून सुमारे 47 हजार गावांचे नकाशे तयार केले आहेत. याद्वारे पाण्यासंदर्भात नियोजन अथवा उपाययोजना करताना गावाच्या कोणत्या भागात नेमकी कोणती पद्धत अवलंबवावी, याची अचूक माहिती मिळणार आहे. भवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे नकाशे सविस्तर माहितीसह उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, फक्‍त गावनिहाय नव्हे, तर तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यपातळीवरील माहिती यामध्ये आहे. या उपक्रमासाठी “युनेस्को’तर्फे निधी देण्यात आला होता. गेली सहा वर्षे यासंदर्भात विभागाकडून काम सुरू होते.

नकाशांद्वारे होणारा लाभ :
प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीनुसार पाण्याबाबत उपाययोजनांची अंमलबजावणी
प्रदेशातील पाण्याची सुटसुटीत आणि सविस्तर माहिती.
शास्त्रीय माहिती उपलब्ध असल्यामुळे नागरिकांमध्येही स्पष्टता.

अडथळे :
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही माहिती पोहचवण्याचे आव्हान.
माहिती उपलब्ध असली, तरी त्याचा प्रत्यक्षात कसा वापर होईल याबाबत साशंकता.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच याचे प्रशिक्षण असल्याने माहितीचा विपर्यास होण्याची शक्‍यता.

आकडेवारी
राज्यातील 10 हजार 167 गावांच्या भूजल पातळीतील घट :
गावे संख्या        घट
1995          3 मीटर
2587          2 ते 3 मीटर
5585          1 ते 2 मीटर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)