पाणी टंचाई स्थितीचा अहवाल 13 ऑक्‍टोबर पर्यंत ; राज्यांतील धरणांमध्ये केवळ 27 पाणीसाठा

मुंबई: केंद्र सरकारने निश्‍चीत केलेल्या निकषानुसार राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या स्थितीचा अहवाल येत्या 13 ऑक्‍टोबर पर्यंत निश्‍चीत केला जाईल अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार राज्यात दुष्काळ जाहींर करायचा की नाही यावर निर्णय घेता येणार आहे. सन 2016 सालापासून दुष्काळाच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी पेरण्यांची स्थिती, मातीतील द्रवाचे प्रमाण, पावसाचे प्रमाण, आणि सध्याची पीक स्थिती अशा निकषाच्या आधारे दुष्काळाची स्थिती निश्‍चीत केली जाते. त्यानुसार राज्यातील दुष्काळाबाबतचा अहवाल निश्‍चीत केला जाणार आहे असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

अत्यंत काटेकोरपणे हा अहवाल तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत. त्यानुसार गाव तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना तशा सुचना करण्यात आल्या असून त्यांच्याकडून माहिती गोळा केली जात आहे. राज्यातल्या 175 तालुक्‍यांमध्ये 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यातील बहुतांशी तालुके हे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रांतील आहेत. राज्यांतील धरणांमध्ये सध्या केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे. तथापी राज्यात सुरूवातीला पाऊस चांगला झाल्याने पेरण्यांचे प्रमाण मात्र चांगले आहे. तो एक निकष दुष्काळ जाहींर करण्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. पण पेरण्या झालेल्या बहुतांश ठिकाणी पेरण्या वाया गेल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)