पाणी टंचाई आराखडयातील जवळपास 90 ट्‌क्‍के काम पुर्ण…

 

पुणे,  (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील टंचाई निवारणासाठी 21 कोटी 20 लाखांचा पाणी टंचाई आराखडा तयार केला होता. या आराखडयातील जवळपास 90 ट्‌क्‍के काम पुर्ण झाली आहे.
निविदाकडे ठेकेदारांनी पाठ फिरवणे आणि तांत्रिक अडचणीमुळे दहा टक्के काम शिल्लक राहिली आहे.
जिल्ह्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने ऑक्‍टोबर 2016 ते जून 2017 या कालावधीत करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामासाठी 21 कोटी 20 लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार 357 गावातील 1 हजार 558 वाड्यावस्त्यामध्ये 602 जलसंधारण्याची कामे करण्यात येणार होती. यापैकी आज अखेर 449 कामे पुर्ण झाले आहे. विंधन विहिर दुरूस्तीमधील 12 काम तांत्रिक कारणामुळे करता येणार नाही. शंभर ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय 35 नविन विंधनविहीरी कुपनिलका घेणे, 43 नळ योजनांची विशेष दुरुस्ती, 359 विंधन विहीरींच्या दुरुस्ती, नळ पाणी पुरवठा योजना वेगाने पुर्ण करणे, तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना, 33 विहिरींचे अधिग्रहण करण्याचे काम झाले आहे. लवकरच पुरवणी टंचाई आराखड्यातील काम सुरू करण्यात येणार आहे. पुरवणी टंचाई आराखड्यानुसार 200 गावातील 1 हजार 351 वाड्यावस्त्यामध्ये 995 कामे करण्यात येणार आहे. यासाठी 15 कोटी 43 लाखांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या पुरवणी टंचाई आराखड्यातील 56 कामांना लवकर मंजुरी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्यावर मात करण्यासाठी 30 जुन पर्यंतचा पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना आराखडा तयार केला होता. या आराखड्यातील जवळपास सर्व काम पुर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची जास्त झळ जाणवली नसल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)