पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांचे काम संथ

पुणे – राज्यातील विविध भागांत जाणविणाऱ्या पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांचे काम सध्या संथ गतीने सुरू आहे.आतापर्यंत फक्त 34 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ज्वारी आणि हरभऱ्याचे क्षेत्र यंदा घटल्याचे चित्र आहे.

राज्यात साधारण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्याचे काम सुरू होते. साधारण पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक पेरण्या याच दरम्यान झालेल्या असतात, पण यंदा मात्र हे प्रमाण अल्प आहे. राज्यात एकूण रब्बीचे 53.93 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यत फक्त 19.30 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

-Ads-

राज्यात सर्वाधिक पेरण्या या अमरावती विभागात झाल्या आहेत. या विभागात 6.47 लाख हेक्‍टर क्षेत्र रब्बीचे आहे. त्यापैकी 3.71 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या म्हणजे 57 टक्‍के पेरण्या झाल्या आहेत. कापूस तसेच हरभरा पिकामध्ये आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर विभागात 46 टक्‍के पेरण्या झाल्या आहेत. या विभागात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. नागपूर आणि लातूर विभागांतही चाळीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लागवड झाली आहे. सर्वात कमी लागवड ही औरंगाबाद विभागात झाली आहे. या विभागात आतापर्यत फक्त 18 टक्‍के पेरण्या झाल्या आहेत. पाणी टंचाईमुळे या परिसरात ही स्थिती उद्‌भवली आहे. या विभागात रब्बीचे एकूण 7.73 लाख हेक्‍टर क्षेत्र असून त्यापैकी फक्त 1.41 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

पुणे विभागात रब्बीच्या पेरण्या रखडल्या
पुणे विभागातही रब्बीच्या पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. या विभागात आतापर्यत फक्त 24 टक्‍के पेरण्या झाल्या आहेत. या विभागात एकूण 17.83 लाख हेक्‍टर क्षेत्र हे रब्बीचे आहे. त्यापैकी 4.21 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ज्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा अनेक भागांत पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पिक वाढीवर परिणाम झाला आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी झालेल्या हुमणी रोगामुळे सुद्धा क्षेत्र घडले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)