पाणी टंचाईची थेट पंतप्रधानांकडे तक्रार

पिंपरी – महापालिकेकडून शहरातील हाउसिंग सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा महापालिकेकडे दाद मागितली होती. मात्र त्यामधून अद्याप हा प्रश्‍न न सुटल्यामुळे त्यांनी पंतप्रधानांकडे दाद मागितली असल्याचे पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन अध्यक्ष सुदेश राजे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सोसायट्यांना महापालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने टॅंकर मागवावे लागतात. महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये गळतीचे प्रमाण सुमारे 40 टक्‍के आहे. त्यामुळे शहरातील सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.

आतापर्यंत महापालिका आयुक्‍तांना याविषयाबाबत चार वेळा निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सोसायट्यांना दररोज अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शहरातील वाकड, पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर, पिंपळे-निलख, रहाटणी या भागात हौसिंग सोसायट्यांची संख्या जास्त असून, त्याभागातील सोसायट्यांना पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार
पाण्याबरोबरच या भागातील कचऱ्याचा प्रश्‍नदेखील गंभीर बनला आहे. महापालिकेने मोठ्या सोसायट्यांना सांडपाणीप्रक्रिया प्रकल्प बसवण्याची सक्‍ती केली आहे. या सर्व प्रश्‍नांवर मार्ग काढण्यासाठी फेडरेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. याखेरीज आमदार आणि स्थानिक नगरसेवकांना याबाबतचे निवेदन देणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)