पाणी चोरणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी

आखेगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शेवगाव – तालुक्‍यातील आखेगाव ग्रामस्थांचे पाणी चोरणाऱ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, तहसिलदार विनोद भांमरे यांना निवेदनाव्दारे केली आहे.
आखेगाव येथे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सालवडगाव येथील पाण्याच्या टाकीवरुन 5 इंची पाईपलाईन टाकलेली आहे. गावची लोकसंख्या मोठी असून हे पाणी पिण्यासाठी पुरत नाही. तब्बल आठ दिवसांतून एकदा ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळते. एका दिवसाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीला रोज दोन हजार रुपये खर्च येतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा अपुरा होत असल्याचे ग्रामपंचायतीचे उपसरंपच, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हा अपुरा पाणीपुरवठा का होतो याचा शोध घेतला असता सालवडगाव फाट्याजवळ एका मिलचे बांधकाम सुरु असून या बांधकामासाठी मुख्य जलवाहिनी फोडून अनधिकृतपणे नळजोड घेतल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हा अनाधिकृत नळजोड तोडला. त्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची अनाधिकृत चोरी करणाऱ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ही कंपनी ही एका राजकीय व्यक्तीशी संबंधीत असून त्या दबावामुळे पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी या बाबतीत काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यांच्या संगनमतानेच असे अनाधिकृत कनेक्‍शन घेतले असून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
निवेदनावर गावचे उपसरपंच शंकर नाचण, ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी डोंगरे, भाऊसाहेब पायघन, शितल नाचण, मनोहर काटे, रामकृष्ण कोल्हे, अशोक काकडे, सचिन खर्चन, महादेव नाचण, पोपट ससाणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)