पाणी घेण्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल द्या

जलसंपदा विभागाने पालिकेला दिली 17 जानेवारीची “डेडलाइन’

पुणे – महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेने पाणी घेण्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल दि.17 जानेवारीपर्यंत जलसंपदा विभागाला देणे बंधनकारक केले आहे.

जलसंपत्ती प्राधिकरणाने महापालिकेला लोकसंख्येनुसार दररोज 892 एमएलडी पाणी घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र, महापालिकेकडून दररोज 1,350 एमएलडी पाणी घेण्यात येत आहे. दरम्यान, प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेला नेमक्‍या किती पाण्याची गरज आहे, महापालिकेच्या दाव्यानुसार वाढलेली लोकसंख्या, गळती, पाणीबचतीची उपाययोजना यांबाबत जलसंपदा विभागाला अहवाल दि.17 जानेवारीपर्यंत देणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेकडे केवळ सहा दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. हा अहवाल जलसंपदा विभागाला प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करता येणे शक्‍य होणार आहे, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, कृष्णा खोरे महामंडळाकडे जलसंपदा विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत महापालिकेचा अधिकाऱ्यांनी अहवाल देण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महापालिका प्रशासन अहवाल तयार करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)