पाणी कपातीबाबत गटनेत्यांची आज बैठक

पिंपरी – यंदाच्या वर्षी पावसाळ्या दरम्यानच पवना धरण 100 टक्के भरले होते. परंतु परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी नागरिकांसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण करू शकते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने धरणात अवघे80 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणी कपातीसंदर्भात धोरण निश्‍चित करण्यासाठी मंगळवारी (दि.27) आयोजित करण्यात आली आहे. सकाळी अकरा वाजता महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक जलशुध्दीकरण केंद्र निगडी येथे तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण यंदा 100 टक्के भरले होते, परंतु परतीचा पाऊस पुरेसा न पडल्याने शंभर टक्‍केची पातळी पावसाळ्याच्या अखेरपर्यंत टिकून राहिली नाही. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान स्वत: आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दखल घेतली होती. आज पवना धरणात 80 टक्के पाणीसाठा उरला आहे. भविष्यातील पाणी संकट आणखी गडद होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने प्रमुख पदाधिकारी तसेच गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, आयुक्‍त श्रावण हर्डीकर तसेच पाणी पुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)