पाणी कपातीचा निर्णय “वेटींग’वर

पिंपरी –पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपातीबाबत आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, सलग दुसऱ्यांधा ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुले शहराच्या पाणीकपातीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही.

यंदा परतीचा पाऊस कमी झाल्यामुळे पवना धरणात आता अवघा 80 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणी कपातीसंदर्भात धोरण निश्‍चित करण्यासाठी मंगळवारी (दि.27) आयोजित करण्यात आली होती. मात्र, कार्यालयीन कामकाजाकरिता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे मुंबईला गेले होते; तर महापौर राहूल जाधव यांच्या दिवसभरातील व्यस्त दिनक्रमामुळे या बैठकीला वेळ मिळाला नाही. त्यामुळे ही बैठक उद्यावर ढकलण्यात आली आहे.
गेली दोन महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यावर महापालिकेच्या सभागृहात जोरदार चर्चा झाली होती. तसेच, प्रशासनाचा निषेध करत महासभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या तहकूब सभेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सभागृहात केलेला खुलासा सदस्यांनी फेटाळुन लावला होता. दरम्यान, महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर व अन्य पदाधिकारी परदेश दौऱ्यावर गेल्याने, 20 नोव्हेंबरला झालेल्या महासभेत उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी व्सिकळीत पाणीपुरवठ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देत, ही सभा तहकुब केली होती.या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पाणीकपातीबाबत गटनेत्यांची आयोजित केलेली बैठक दुसऱ्यांदा तहकुब केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)