पाणी कपातीप्रकरणी राष्ट्रवादीचा महापौरांना घेराव

पुणे – पुणेकरांवरील पाणी कपात मागे घ्यावी, या मागणीसाठी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांना जवळपास तासभर त्यांच्या कार्यालयात घेराव घातला. पुणेकरांना सुरू असलेला पाणी पुरवठा कायमस्वरूपी ठेवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौर कार्यालयात आल्यानंतर महापौरांनी त्यांना भेट नाकारली. त्यामुळे या आंदोलकांनी दालनातच ठिय्या मांडला. अखेर महापौरांनी निवेदन स्वीकारल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, सत्ताधारी भाजपकडून पुणेकरांची फसवणूक केली जात असून केवळ दोन वेळ पाणी देण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे धरणे भरली असताना पुण्याचे इतरत्र पळविण्याचा अथवा कपात करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी चेतन तुपे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)