पाणीमीटरची सक्तीचा हुकूम शासनाने रद्द करावा

डॉ. इंद्रजीत मोहिते यांची मागणी

कराड – शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची घनमापन पध्दतीने अकारणी करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. निर्णयामधील अटी अतिशय कठीण आहेत. शासनाने हे करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेवून एकप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय ओढवला आहे. त्यामुळे शासनाने हा हुकूम रद्द करावा, अशी मागणी भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मदनराव गणपतराव मोहिते, उत्तमराव मोहिते, कृष्णत चव्हाण-पाटील, आबा सुर्यवंशी, जयवंतराव पाटील, शिवाजीराव मोहिते, मनोहरसिंह थोरात, विनोद पाटील आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. मोहिते म्हणाले, जलसंपत्ती प्राधिकरणाने शासन निर्णय घेवून 1 फेब्रुवारी 2018 ते 30 जून 2020 या कालावधीसाठी घनमापन पध्दतीने अकारणी दर जाहीर केले आहेत. त्यामुळे पाणी मोजून देणे व घेणे बंधनकारक राहणार आहे. येथून पुढे घरगुती, औद्योगीक व कृषी सिंचनासाठी पाणी मोजून घेवूनच उचलावे लागणार आहे. याबाबत आम्ही रेठरे बुद्रुकमध्ये ज्या-ज्या शेतकऱ्यांना नोटीस पोहचल्या आहेत. त्यामधील सुमारे अडीचशे शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन पाटबंधारे विभाग, प्रांताधिकारी तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण व आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडे दिली आहेत. शासनाने नदी, विहीर, कृष्णा कालवा यातून होणाऱ्या पाणी उपसा यंत्राजवळ पाईपलाईनला पाणी मापक यंत्र स्वखर्चाने बसवून घ्यावे, तत्पूर्वी पाणीमापक यंत्र न बसविल्यास क्षेत्राची दिडपट दराने अकारणी अथवा पाणी परवाना त्याचबरोबर उपसा यंत्र परवाना रद्द करुन वीज कनेक्‍शन बंद करणे, अशा कार्यवाहीची नोटीस शेतकऱ्यांसह इरिगेशन योजनांना पाठवल्या आहेत. शासनाचा हा निर्णय पूर्णतः अन्यायकारक आहे.

याबाबतची शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळालेली नाही. पाणी मोजून दराची अकारणी किती करणार याचीही कल्पना नाही. पाणी मोजणी मीटरही शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अगोदरच शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक परिस्थिती, हमीभावाचा अभाव व वाढती महागाई तसेच रोजगार उपलब्धी, वीजेची अकारणी, वहातूकीचा खर्च यासह कारखानदारीकडून एफआरपीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. असे असताना शासनाचा हुकूम शेतकऱ्यांना खाईत लोटणारा आहे. सदरचा हुकूम स्थगित करुन मागे घ्यावा. न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा डॉ. मोहिते यांनी यावेळी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)