पाणीप्रश्‍न महत्त्वाचा, राजकीय पक्ष नंतर

पाबळ ग्रामसभेत पाणीप्रश्नी सर्वपक्षीयांचा आंदोलनाचा इशारा

पाबळ-गेली पन्नास वर्षे दुष्काळाला तोंड देत मेटाकुटीस आलेल्या पाबळ व केंदूर परिसर गावांतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून, या भागासाठीचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न धसाला लावण्यासाठी एकत्र येत, आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आता पाणी मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा ठराव करून या भागातील लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी पाबळ केंदूर व परिसरातील गावांचे व पाबळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. त्यानुसार सर्व गावातील ग्रामपंचायतीचे ठराव एकत्र करण्यात येणार असून त्यानंतर लोकप्रतिनिधीची बैठक बोलावून त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. तर पाणी मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले. यावेळी या भागातील सीमाभागात आजही कालव्याचे पाणी वाहत असताना, सर्वच लोकप्रतिनिधींनी विविध धरणातून पाणी देण्याची आश्वासने दिली; मात्र या गावांना उपेक्षित ठेवल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी या भागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सर्व गावांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न उग्र रूप घेणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी या आंदोलनास उत्स्फूर्त पाठींबा व्यक्त केला. सर्वच राजकीय कार्यकर्त्यांनी “आधी पाणी मगच राजकीय पक्ष’ अशी ठाम भूमिका घेणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधी आता काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  •  आमचा एकच मुद्दा आहे, आम्हाला फक्त कायमस्वरूपी पाणी पाहिजे, ते त्यांनी कुठून आणायचे, कसे आणायचे याबद्दल काही माहित नाही. या परिसरातील बाधित गावांना पाणी मिळावे, यासाठी आम्ही या गावात जाऊन ग्रामसभांचे ठराव घेणार आहोत. ते ठराव या नेत्यांना देऊन त्यांना एका महिन्याची मुदत देणार आहोत, त्यांतर त्यांना जाग आली नाही तर मतदानावर बहिष्कारासह इतर मार्गाने आमचे आंदोलन तीव्र करणार आहे.
    -पोपट चौधरी, ग्रामस्थ पाबळ
  • मी शिवसेनेचा विभाग प्रमुख असलो तरी मला गावचा प्रश्न महत्वाचा आहे. आता क्रांतीची ज्योत पेटली आहे, संपूर्ण पाबळ व केंदूर परिसरातिल तरुण एकत्र आला आहे. कारण या भागातले लोकप्रतिनिधी पाणी येईल पाणी येईल, असे म्हणून गेली कित्येक वर्षे लोकांची दिशाभूल करीत आहेत. आम्ही सर्वांना बरोबर घेत या प्रश्नावर गंभीर असून पाणीप्रश्न सुटण्यासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करू.
    -सोपान जाधव, विभागप्रमुख शिवसेना
  • थिटेवाडी बंधाऱ्यात पावसाच्या पाण्याशिवाय पाणी येत नाही, ते आले तरच या भागाचा विकास होणार आहे, त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून कायमस्वरूपी पाणीप्रश्नावर एकत्र येत आहोत. त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही वाढता संघर्ष करू, यासाठी कोणत्याही नेत्यांशी तडजोड करणार नाही.
    -भरत साकोरे/पांडूरंग साकोरे, ग्रामपंचायत सदस्य केंदूर राष्ट्रवादी

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)