पाणीपुरवठ्याच्या कामासाठी 31 ऑगस्टपर्यंतची “डेडलाईन’

आयुक्‍त हर्डीकर यांचे आदेश : ताथवडे पाणी पुरवठा योजना

पिंपरी – जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत महापालिका हद्दीतील ताथवडे गावात पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू असून, 20 टक्के कामे अद्याप शिल्लक राहिली आहे. ही कामे 31 ऑगस्टपर्यंत मार्गी लावा, असे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

चिंचवडच्या ऑटो क्‍लस्टरमध्ये आयुक्‍त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ताथवडे येथील पाणीपुरवठा योजनेबाबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी आयुक्‍तांनी योजनेचा आढावा घेतला. ताथवडे गावाचा विकास आराखडा 6 जानेवारी 2017 रोजी शासनाने मंजूर केला आहे. या आराखड्यानुसार अद्यापही काही रस्ते मनपाच्या ताब्यात आले नाहीत. यामुळे तेथील उर्वरीत पाईपलाईन दुसरीकडे टाकावी लागणार आहे.

ताब्यात न आलेल्या रस्त्यातील शिल्लक पाईपलाईन सध्याचा प्रभाग क्रमांक 25 मधील निवासी भागात वितरण नलिका नसलेल्या ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंत टाकून कामे पूर्ण करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत ताथवडे गावाची पाणीपुरवठा योजना राबविणे, पाईपलाईनच्या कामाची व्याप्ती कमी करणे व प्रभाग क्र.25 मधील निवासी असलेल्या पण वितरण नलिका नसलेल्या ठिकाणी सदरची शिल्लक राहिलेली पाईपलाईन टाकणेसाठी महापालिका विधी समिती सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)