पाणीपुरवठा सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी खैरमोडे

पाटण, दि. 27 (प्रतिनिधी) : शासकीय पाणीपुरवठा सरकारी सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा या संस्थेच्या चेअरमनपदी पाटण येथील भानुदास खैरमोडे व व्हाईस चेअरमनपदी श्रीमती अलका विभुते यांची एकमताने निवड करण्यात आली.सातारा व कराड विभागातील शासकीय पाणीपुरवठा सरकारी सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अधिकारी, संचालक यांची बैठक सातारा येथे पार पडली. या बैठकीत सर्वानुमते वरील निवडी करण्यात आल्या. या निवडीबद्दल भानुदास खैरमोडे व श्रीमती अलका विभूते यांचे कराडचे कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, उपकार्यकारी अभियंता ए. आर. ढोंगे, उपअभियंता एम. एस. देशपांडे, प्रदिप चव्हाण, संचालक सुरेश संकपाळ यांच्यासह मित्र परिवार यांनी अभिनंदन केले. दरम्यान, चेअरमनपदी भानुदास खैरमोडे यांची निवड झाल्याबद्दल पाटण तालुक्‍यातील भोई समाजाच्यावतीनेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)