पाणीपुरवठा योजनेसाठी पावणेसहा कोटी मंजूर

लोणी काळभोर- राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत लोणी काळभोर – थेऊर जिल्हा परिषद गटातील पाच गावांमधील पाच नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी तब्बल पावणेसहा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर काळभोर यांनी दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, लोणी काळभोर – थेऊर जिल्हा परिषद गटातील आळंदी म्हातोबा, कोलवडी, कुंजीरवाडी, लोणी काळभोर आणि नायगाव या पाच गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या पाच नळ पाणीपुरवठा योजनांसाठी एकूण 5 कोटी 67 लाख 57 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आळंदी म्हातोबा 71 लाख 75 हजार, कोलवडी 1 कोटी 81 लाख 6 हजार रुपये, कुंजीरवाडी 1 कोटी 15 लाख 37 हजार रुपये, रायवाडी, लोणी काळभोर 1 कोटी 16 लाख 18 हजार रुपये आणि नायगाव 82 लाख, 67 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी रुपयांच्या आतील पाणी पुरवठा योजनांना पुणे जिल्हा परिषदेत मंजुरी मिळून कामे लगेच सुरू करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)