पाणीपट्टी थकबाकीदारांवर कोल्हापूर मनपाची धडक कारवाई मोहिम

कोल्हापूर – कोल्हापूर शहर पाणी पूरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेची मोहिमेअंतर्गत आज सदर बाझार या भागातील 8 अनधिकृत कनेक्‍शनधारक व 3 थकबाकीदारांवर कारवाई करुन रक्कम रु.1 लाख 16 हजार 619 रूपयांची थकबाकी वसुली करण्यात आली. याकामी सदरबाजार,नागाळा पार्क, निंबाळकर कॉलनी या परिसरातील शारदा दाभाडे, शिवाजी नाथा पोवार, शिवाजी धनवडे, हे तीन थकबाकीदारावर कारवाई करण्यात आली. तसेच सदर बाजार झोपडपट्टी परिसरातील 8 अनधिकृत कनेक्‍शन खंडीत करणेची कारवाई करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, कोल्हापूर मनपामध्ये अनेक नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाचे पाणीपट्टी थकवले होते. त्यामुळे मनपाच्या पाणी पुरवठा विभादाकडून आज ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता हुजरे, पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत, वसुली पथक प्रमुख मोहन जाधव, तसेच भागातील सर्व मिटर रिडर्स यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)