पाणीपट्टी ठरावाविरोधात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी – नागरिकांना दरमहा शंभर रुपये पाणी शूल्क लागू असताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दरमहा 6 हजार लिटर पाणी देण्याची फसवी योजना जाहीर करून नागरिकांची फसवणूक केली आहे. भाजपने दरमहा प्रतिकुटुंब पाणी पट्टीचे शंभर रुपये शूल्क सोयीस्कररित्या लपविले आहेत, असा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश बाबर यांनी केला असून याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत योगेश बाबर यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. त्यामध्ये बाबर यांनी म्हटले आहे की, सध्याच्या पाणी दरानुसार 1 ते 30 हजार लिटरपर्यंत प्रतिमहा 2.50 प्रति एक हजार लिटरचा दर निश्‍चित आहे. यानुसार पाच व्यक्तींच्या कुटुंबाने दरमहा 20 हजार 250 लिटर पाणी वापरल्यास दरमहा येणारा पाणी पट्टीचा खर्च 51.25 एवढा खर्च येतो. सध्या याव्यतिरिक्त कुठलेही शूल्क लागू नाहीत.

-Ads-

नवीन ठरावानुसार पाच व्यक्तींच्या कुटुंबासाठी दरमहा 1 ते 6 हजार लिटर पाणी मोफत जाहीर केले आहे. 6 हजार 1 ते 15 हजार लिटर पाण्यासाठी 72 रुपये आणि 15 हजार 1 ते 20 हजार 250 लिटर पाण्यासाठी 65.62 रुपये शूल्क आकारले जाणार आहेत. यानुसार 137.62 रुपये शूल्क होतात. याला प्रतिकुटुंब मासिक 100 रुपये शूल्क जोडल्यास 237.62 रुपये एवढा दर येतो. नागरिकांना एवढे दर प्रतिमहा भरावेच लागणार आहेत. भाजपने सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी सवलतीची फसवी योजना जाहीर केली आहे. या घोषणेच्या नावाखाली सर्वसामान्यांवर पाण्याची दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयाचा शिवसेनेतर्फे निषेध व्यक्त केला आहे. हा पाण्याचा ठराव फेटाळून पाणीपट्टी पूर्वीप्रमाणेच आकारण्यात यावी, अन्यथा दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाबर यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)