पाणीपट्टीबाबत मंत्री महाजन यांना निवेदन

कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद ही ब वर्गातील असून, उत्पन्नाची साधने मर्यादित आहेत. त्यातच नगरपालिकेस व्यावयासिक दराने पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. त्यामुळे ती घरगुती दराने आकारण्यात यावी, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे व गटनेते रवींद्र पाठक यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
ना. महाजन हे शिर्डी येथे आले असता, त्यांचे काकडी विमानतळावर स्वागत करण्यात आले. त्यावेळी हे निवेदन देण्यात आले.

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात, सभापती स्वप्नील निखाडे, नगरसेवक संजय पवार, सत्येन मुंदडा, विवेक सोनवणे, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, कालुआप्पा आव्हाड, अरिफ कुरेशी, दीपक जपे आदी उपस्थित होते. आमदार कोल्हे म्हणाल्या, जलसंपदा खात्यामार्फत कोपरगाव नगरपालिकेला पिण्याचे पाणी सरसकट व्यावसायिक दराने पुरविले जाते. परिणामी थकबाकीत मोठी वाढ झाली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्यासह नाशिक पाटब्‌ंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन थकीत पाणीपट्टीबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जानेवारी 2015 पासून एकेरी दराने पाणीपट्टी विलंब आकारासह 4 जानेवारी 2017 रोजी 17 लाख 26 हजार रुपये, तसेच एप्रिल 2016 ते मार्च 2018 ची नियमीत पाणीपट्टीचा भरणा पाटबंधारे खात्यास केला आहे. सध्या नगरपालिकेकडे 5 कोटी 93 लाख रुपये थकीत बाकी आहे. व्यावसायिक दराने पाणीपट्टी भरणे पालिकेस अशक्‍य आहेत. त्यामुळे ती घरगुती दराने आकारण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस द्यावी, अशी मागणी केली. त्यावर ना. महाजन यांनी माहिती घेऊन याबाबत लवकरच तोडगा काढू, असे आश्‍वासन दिले. गटनेते रवींद्र पाठक यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)