पाणीकपात न करता शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तन द्या !- आमदार राहुल कुल

ऍड. राहुल कुल यांची कालवा सल्लागार बैठकीत मागणी

यवत- शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तन कोणतीही पाणीकपात न करता द्या, अशी मागणी दौंड तालुक्‍याचे आमदार ऍड. राहुल कुल यांनी कालवा सल्लागार बैठकीत केली. मुंबई येथे (दि. 26) रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार कुल म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतीला उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे व जून महिन्याच्या दरम्यान एक आवर्तन दिले जाणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पाणी कपात करू नये, अशी विनंती त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचेकडे केली.

पुण्याला पिण्यासाठी पाणी देण्याबाबत कोणतेही दुमत नसून शेतीसाठी देखील पाणी मिळाले पाहिजे. मुंढवा जॅकवेल प्रकल्पाचे काम झालेले नसताना 3 वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून यामधून मोठ्या प्रमाणात अशुध्द पाणी बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाते. या अशुद्ध पाण्यामुळे शेतकऱ्यांना आजार होऊ लागले असून, शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यामुळे हे पाणी शुद्ध करून मिळण्याची आवश्‍यकता आहे. तसेच बेबी कालव्याचे रखडलेले अस्तरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी आमदार कुल यांनी केली.

  • गळती थांबविण्या संदर्भात उपयोजना सुरू आहेत. कालवा कायम सुरू असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत त्यामधून मार्ग काढून उपयोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. व पुणे महानगर पालिकेकडे असलेली थकबाकी वसूल करून खडकवासला कालव्याचे अस्तरी करणाचे काम पूर्ण करण्याचा सूचना त्यांनी केल्या.
    – गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
  • शेतीला मुबलक पाणी मिळेल
    पालकमंत्री गिरीश बापट यांनी बेबी कॅनॉलचे अस्तरीकरण करण्यास सुमारे दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागल्यामुळे अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि अस्तरीकरण व कालव्यावरील पुलांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली. तसेच शहरी व ग्रामीण असा कोणताही विचार न करता शेतीला देखील मुबलक पाणी मिळेल असा विचार करून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना बापट यांनी केल्या.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)