पाणपोईसारखे सामाजिक उपक्रम हाती घेणे गरजेचे : देशमुख

वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नेवासा शहरात पाणपोई
नेवासा – येथील वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नेवासा शहरातील पोष्ट ऑफिस रोडवर जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पाणपोई सुरू करण्यात आली. पाणपोई सारखा उपक्रम हे पुण्याचे कार्य आहे. असे उपक्रम सामाजिक संघटनांनी हाती घेणे गरजेचे आहे, असे आवाहन संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.
यावेळी वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष कावरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मुख्य रस्त्यावर पाणपोईची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम आम्ही हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ व्यापारी रमेश शिंगी, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, ज्येष्ठ कार्यकर्ते गफूर बागवान, नगरसेवक सतीश पिंपळे, वसुंधरा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. करणसिंह घुले, सुभाष कडू, ऍड. संजीव शिंदे, अशोक ताके, अमृत फिरोदिया सुभाष चव्हाण, विजय मुनोत, अभिजित मापारी, योगेश रासने, संदेश शिंगी, संतोष भागवत, शकील शेख, दत्तात्रय पठाडे, बाबा डौले, राजेश जगताप, राजेंद्र कडू, पवन देशमुख, आदित्य चव्हाण, विलास इरले यांच्यासह चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)