पाठलाग करुन तरुणीचा विनयभंग

पिंपरी – तरुणीचा पाठलाग करत तसेच तिच्या घरासमोर अश्‍लील हावभाव करत विनयभंग केल्याचा प्रकार मोशी परिसरात घडला आहे. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सूर्यभान शेख आणि कृष्णा धोत्रे या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित तरुणीच्या जवळच्या परिसरात राहतात. त्यांची एकमेकांशी तोंडओळख आहे. मागील काही दिवसांपासून सूर्यभान आणि कृष्णा तरुणीच्या घरासमोर येऊन अश्‍लील हावभाव करत होते. तरुणी कामानिमित्त घराबाहेर पडल्यास दोघेजण तिचा पाठलाग करीत तसेच तिला वारंवार हातवारे करीत होते. याबाबत तरुणीने दोघांविरोधात तक्रार दिली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)