पाठदुखी : वाईट सवयींचा परिणाम

पाठ दुखण्याची तक्रार पुष्कळांची असते. पाठीच्या स्नायूंचा थकवा हे सर्वात जास्त वेळा पाठदुखीचे कारण असते. पाठीच्या करण्याची योग्य वक्रता ठेवण्याचे काम हे स्नायू करत असतात. त्यामुळे बसताना (खुर्चीवर, बाकावर, स्टुलावर, जमिनीवर) पाठ सरळ ठेवून बसण्याची सवय लावून घेणे अत्यंत आवश्‍यक असते. पुढे वाकून बसणे, चालताना पाठ सरळ न ठेवणे या सवयी पाठीच्या आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक असतात. एकदा अशी सवय जडली की पाठीच्या स्नायूंवर अकारण ताण येतो. पाठ दुखू लागते. याला पॉश्‍चरल बॅकएक म्हणतात. दीर्घकाळ बसून राहणाऱ्या व्यक्तींमध्ये (बैठे काम करणारे बुद्धिजीवी, विद्यार्थी, परीक्षार्थी, टीव्हीचे प्रेक्षक, प्रवासी, इ) हा पाठदुखीचा प्रकार प्रामुख्याने आढळतो.
हे करून पाहा

नियमाने पाठीचे व्यायाम करणे आणि बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या सदोष पद्धती सोडून पाठ सरळ, ताठ ठेवणे हा या पाठदुखीवरील उपाय आहे.

पोटावर आणि पाठीवर पडून हे व्यायाम करावेत. सूर्यनमस्कार घालावेत, योगासने करावीत. विशेषकरून शलभासन, भुजंगासन, नौकासन, धनुरासन अशी पोटावर झोपून करण्याची आसने उपयोगी पडतात.

अॅनिमिया हे पाठदुखीचे कारण?
होय रक्‍तक्षय म्हणजेत अॅनिमिया झालेल्या व्यक्‍तीच्या पाठीचे स्नायू इतर शरीरातील स्नायूंप्रमाणे लवकर थकतात. त्यामुळे पाठ व मांड्या, पिंड-या दुखतात. आहारात लोहाची कमतरता असणे हे भारतीय स्त्रियांमध्ये असा अॅनिमिया होण्याचे एक प्रमुख कारण असते. त्या दृष्टीने पालेभाज्या, लॅट्युसची पाने (सॅलड), टोमॅटो, गाजर, बीटरूट, पपई, चिक्कू, कलिंगड, शेवगा, काळी मनुका, खजूर यांचे सेवन करावे.

शाकाहारातून येणारे लोह या स्वरूपातून फेरस या स्वरूपात लिंबू पिळून घ्यावे. म्हणजे जीवनसत्त्व क (व्हिटॅमिन सी) उपलब्ध होते. जीवनसत्त्व क मुळे फेरिक लोहाच्या अणूचे फेरस अणूत रूपांतर होते व लोह शोषले जाते. ताज्या फळांत जीवनसत्त्व क असते. ताजी फळे खावीत. पेरू हा जीवनसत्त्व क मिळवण्याचा चांगला मार्ग आहे. संत्री, मोसंबी, लिंबू, आणि आवळा या फळातून ते मिळतेच.

त्याचप्रमाणे जीवनसत्त्व ब-12 (व्हिटॅमिन बी – 12) आणि फोलिक अॅसिड यांचा अभावदेखील रक्‍तक्षयाला कारणीभूत ठरतो. जीवनसत्त्व ब -12 फक्त प्राणिजन्य आहारातून मिळते. शाकाहारी व्यक्तींनी दूध, दही घेणे आवश्‍यक असते. फोलिक अॅसिड हिरव्या वनस्पतीपासून मिळते, परंतु शिजवताना ते नष्ट होते. याकरिता कोशिंबीर व ताजी फळे घेणे जरूरीचे असते.

पाठीच्या कण्यातील मणक्‍यात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले की मणके कमजोर होतात. वयोमानानुसार, वारंवार बाळंतपणामुळे, आहारात कॅल्शियम कमी पडण्याने, काही आजारात असे घडते. त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. दूध हा कॅल्शियमचा सर्वांत चांगला स्रोत आहे. वाढत्या वयात तर दूध आवश्‍यक आहे. योग्य सवयी आणि आहार तुम्हाला या आजारापासून दूर ठेवतो. असे केले तरच तुम्हाला पाठदुखीपासून आराम मिळण्याची प्रक्रिया सुरू होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)