‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच

समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच नुकताच महाराष्ट्राचे महसूल, मदत-पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

 

दिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या आजवरच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ‘पाटील’ चित्रपटाला चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)