पाटील इस्टेट परिसरात अग्नितांडव ; ९५ झोपड्या जळून खाक

पुणे: पुण्यात शिवाजी नगर येथिल संचेती हॉस्पिटल जवळ पाटील इस्टेट परिसरात आज दुपारी आग लागली. हीआग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आतापर्यंत आगीत जवळजवळ ९५पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

-Ads-

आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. घरांतील सिलिंडरच्या स्फोटामुळं आग आणखी पसरत आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी झोपड्यातील ज्वलनशील वस्तू बाहेर काढण्याचा अग्निशमन जवानांचा प्रयत्न आहे. घरातील वस्तू डोक्यावर घेऊन बाहेर काढल्या जात आहेत. आगीमुळं पिंपरीकडून पुण्याकडे येणारा खडकीच्या पुढचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळं या रस्त्यावर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)