पाटस येथे बसडेपोसाठी ग्रामस्थ उपोषण करणार

वरवंड -पाटस येथील बसडेपोचा सुमारे 25 वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागावा, याकरीता पाटस ग्रामविकास फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ 11 ऑगस्ट पासून नियोजित पाटस बसडेपोसाठीच्या नियोजित जागेवर लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.
पाटस येथील बसडेपोचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुमारे 20 हजार सह्यांचे निवेदन पाटस बस डेपो समर्थन स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या अभियानाची सांगता लाक्षणिक उपोषणाने करण्यात येणार आहे. पाटस बसडेपो संदर्भात गेली 3 वर्ष पाटस ग्रामविकास फाऊंडेशनमार्फत पाठपुरावा केला जात होता. यामध्ये विभागीय अधिकारी राज्य परिवहन महामंडळ पुणे, कार्यकारी संचालक पुणे, आमदार दौंड, पालकमंत्री पुणे जिल्हा, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य, या सर्व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आली आहेत.
परंतु या पाठपुराव्याला यश आले नाही, म्हणून जनशक्तीज्या माध्यमातून लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पाटस पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सुमारे वीस हजार सह्यांचे बस डेपो मागणीचे निवेदन पाटस ग्रामविकास फाऊंडेशनमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार येणार आहे. दि. 11 ऑगस्टपासून नियोजित पाटस बस डेपोसाठीच्या जागेवर पाटस ग्रामविकास फाऊंडेशन आणि पाटस पंचक्रोशीतील ग्रामस्थ लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)